HW Marathi
राजकारण

बेस्टच्या संपावर उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर उद्या (१२ जानेवारी) राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची बैठक होणार आहे. संप मिटल्याची घोषणा करण्याचा आग्रह सरकार आणि पालिकेकडून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केला जात आहे. मात्र, संपावर तोडगा काढल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, असे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज चौथ्या दिवशी देखील तोडगा निघालेला नाही.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. बेस्टचा हा संप या दशकातील सर्वात दीर्घकालीन मानला जात आहे. यापूर्वी १९९७ सालचा बेस्टचा संप तीन दिवस लांबला होता. गुरुवारी (१० जानेवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत महापौर बंगल्यावर झालेल्या सात तासांच्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर शुक्रवारी (११ जानेवारी) देखील संप सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आला.

Related posts

महाराष्ट्राच्या धमन्यांमधील रक्त उसळणार आहे काय?

News Desk

संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे !

News Desk

मध्य प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर संघावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे आश्वासन

News Desk