HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटक दौऱ्यातील काळ्या बॉक्समध्ये दडलेय तरी काय ?

बेंगळूरू | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कर्नाटक दौऱ्यातील एक मोठी घटना घडली होती. मोदीच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान प्रदेश काँग्रेस काळ्या बॉक्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसने मोदींच्या चित्रदुर्ग दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेला तो व्हिडिओ कर्नाटकमधील हेलिपॅडचा आहे. या व्हिडिओमध्ये एका काळ्या रंगाचा बॉक्स वाहनात ठेवताना दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चित्रदुर्ग दौऱ्यावर असताना हा व्हिडिओ असल्याचा दावा काँग्रेसने केला. युथ काँग्रेस माध्यम इनचार्ज श्रीवत्स यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेसकडून तो कथित काळा बॉक्स मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरविण्यात आला असा दावा केला जात असला, तरी त्यामध्ये कोठेही मोदी किंवा त्यांचे हेलिकॉप्टर दिसून येत नाही. मोदी यांचे हेलिकॉप्टर लँडिंग झाल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

‘द टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुडू राव यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘चित्रदुर्गा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक रहस्यमयी बॉक्स उतरवण्यात आला आणि एका खासगी इनोव्हा गाडीत ठेवण्यात आला. ती कार लगेच तिथून निघून गेली. या बॉक्समध्ये काय होते आणि ही गाडी कोणाची होती याचा तपास निवडणूक आयोगाने केला पाहिजे’.

Related posts

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk

लॉकडाऊनमध्ये कोणतीही विशेष ट्रेन चालवण्यात येणार नाही, रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

News Desk

साठेबाजाला वाचवण्यासाठी राज्यातील भाजप जातेय याचा अर्थ काहीतरी काळंबेरं आहे,राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक

News Desk