HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसने केला ट्वीट

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावरील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि त्यांच्या खासदार प्रितम मुंडे या दोन्ही बहिणी गैरहजर राहिल्या होत्या. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंना आधी भाषण न करून दिल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले, “जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार!”, असे म्हणत व्हिडिओ ट्वीट केला आहे.

व्हायरल व्हिडिमधील मुंडे आणि बावनकुळेंचे संभाषण

बीडच्या गेरवाईमधील कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजा मुंडेंच्या आधी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर गेले. तेव्हा पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणाले, “तुमच्या आधी मी बोलते ना…”, त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना उत्तर देत म्हणाले, “नाही”, यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “दोनच मिनिटे बोलते…” यावर पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नाही”. यानंतर पंकजा मुंडे या त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हे हसत राहिले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार ?

News Desk

शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन तुमच्या पाठीशी! – डॉ. नितीन राऊत

Aprna