HW News Marathi
राजकारण

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा | आरपीआय

ठाणे | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे हल्ला करण्याचा निषेधार्ह प्रकार घडला.त्या दौऱ्यात रामदास आठवले यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच या हल्ल्यामागील सूत्रधार शोधून काढावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक ४ जानेवारी रोजी संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव ठाणे प्रदेश रिपाइंचे निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस सुरेश बारशिंग यांच्या समवेत ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे उपस्थित होते. केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले हल्ला प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवरनिलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भेट घेऊन १७ दिवस झाले तरी अद्याप एकाही जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. याबाबत रिपब्लिकन पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रामदास आठवले यांच्यावर हल्ला घडविण्यामागे कोण सूत्रधार आहे याचा कसून शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. त्याबाबत अद्याप तपासात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही.ना रामदास आठवलेंवर हल्ला घडविण्याचे कारस्थान कुणाचे आहे हे तापसयंत्रणांनी त्वरित शोधले पाहिजे अशी मागणी सुरेश बारशिंग यांनी केली आहे. याबाबत येत्या दिनांक ४ जानेवारी ठाणे प्रदेश आणि पालघर जिल्ह्यात रिपाइं तर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपाइं तर्फे अधिकृतपणे आज रिपाइं चे सचिव सुरेश बारशिंग यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विनोद तावडेंना तिकीट मिळू नये हा नियतीचा अजब खेळ !

Gauri Tilekar

लोकसभेबरोबरच ४ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, जम्मू-काश्मीरवर सस्पेंस

News Desk

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी होणार

Aprna
देश / विदेश

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा घट

News Desk

नवी दिल्ली | देशातील ५ महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. मात्र हा अपवाद वगळता ऑक्टोबर महिन्यापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने कपात सुरु आहे. मुंबईत आज (२९ डिसेंबर) पेट्रोल २९ तर डिझेल ३२ पैशांनी स्वस्त झाले असून पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ७४.८८ रुपये तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ६६.२४ रुपये एवढी झाली आहे.

राजधानी दिल्ली देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. दिल्लीत पेट्रोल २९ तर डिझेल ३० पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीत आज (२९ डिसेंबर) पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ६९.२६ रुपये तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ६३.३२ रुपये एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घट झाल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये घट झाल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

शशिकला यांच्याविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे- डी. रुपा

News Desk

राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव सांगा, मग चर्चा – काँग्रेस

News Desk

अखेर ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

News Desk