HW News Marathi
राजकारण

अभिनेता अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली ‘अराजकीय’ मुलाखत

नवी दिल्ली | बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मोदींनी जीवनातील अनेक पैलू उलगडले आहेत. यावेळी मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दरवर्षी मला एक-दोन कुर्ते आणि मिठाई पाठवतात, अशी आठवण मोदींनी त्यांच्या मुलाखतीती करून दिली आहे. अक्षय कुमार यांनी विरोधकांशी संबंधांबद्दल मोदींना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ही आठवण सांगितली होती. ममता दीदींसबोतच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासोबतही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

मी फार लहान वयात घर सोडले. कारण तेव्हाचे जीवन वेगळेच होते. केव्हा केव्हा कुटुंबीयांबरोबर वेळ घालवण्याची इच्छा व्हायची, तेव्हा आईला बोलावून घ्यायचो, परंतु नंतर आईच बोलायची की मी इथे काय करणार, मी परत जाते. मोदी म्हणाले, माझ्याकडे जेव्हा आई येते, तेव्हा तिला वेळ देता येत नाही. एखाद दुसऱ्या वेळी फक्त तिच्याबरोबर जेवण होते. जर एखादी घटना मला न आवडल्यास मी ती कागदावर लिहितो. ती घटना का झाली, त्यानंतर तो कागद फेकून देत होतो. परंतु तरीही मनाला काही शांती मिळत नव्हती. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी ती घटना कागदावर उतरवत राहतो आणि कागद फाडून टाकतो. तेव्हा मीसुद्धा चुकीचा असल्याचे कळत होते.

या मुलाखतीत मोदींनी त्यांना लष्करात जायची इच्छा होती. लष्करात जाऊन देशसेवा करायची होती असे अक्षय कुमार यांना सांगितले. त्यांना शिस्त आवडते. ते स्वत: अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती आहेत. आपल्याला कुणालाही दुखावण्यास आवडत नाही असे मोदी म्हणाले.

या मुलाखतीवेळी अक्षयने मोदींच्या खासगी जीवनाविषयकही अनेक प्रश्नांची विचारणा केली. त्यावेळी, तुम्ही केवळ ३ ते ४ तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी ७ तासांची झोप हवीच ? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओमाबा यांचा संदर्भ देत, तेही मला हेच सांगतात, असे मोदींनी म्हटले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिर्डीमध्ये मोदींनी केला शेतक-यांचा इव्हेंट’

News Desk

विरोधकांना पराभूत करण्यासाठी तेलंगणात घुबडांचा वापर

News Desk

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk