HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी

मुंबई | काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आमने-सामने येणार आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी (२७ मार्च) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१४ साली याच मतदारसंघातून माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचा तब्बल ४ लाख मतांनी पराभव झाला होता.

गेल्या निवडणुकांमध्ये संजय निरुपम या मतदारसंघातून ४ लाख मतांनी हारले होते. संजय निरुपम यांनी सोडलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचा अन्य कोणताही नेता उभे राहण्यास तयार नव्हता. याच कारणामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी यापूर्वी मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होत होती.

Related posts

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

जावेद हबीब यांचा भाजप प्रवेश, मोदींसह दिग्गजांना नेटकऱ्यांनी दिला नवा लूक

News Desk