HW News Marathi
राजकारण

“अभी भी बहुत सुधार बाकी है”, उर्फी जावेदने ट्वीट करत चित्रा वाघांना डिवचले

मुंबई | “लेकीन अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्र वाघ आय लव्ह यू”, असे ट्वीट करत अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना डिवचले आहे.  उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नोटीस देखील पाठविली आहे. यात आता उर्फी जावेद हीच्या नव्या ट्वीटने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचले आहे.

 

उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्याविरोधात तीन ट्वीट केले आहे. यात पहिल्या ट्वीटमध्ये उर्फी जावेदने म्हटले, “मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू”, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांना टॅग केले आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये उर्फी म्हणाली, “लेकीन अभी भी बहुत सुधार बाकी है, सॉरी चित्र वाघ आय लव्ह यू”, यात चित्रवाघ यांना टॅग केले आहे. या ट्वीटमध्ये उर्फीने तिचा बैकलेस ड्रेस घातलेला फोटो टाकला आहे.

“चित्रा वाघने मुझे सुधार दिया लव्ह यू बेस्टी”, असे तिसरे ट्वीट उर्फीने केले आहे. या उर्फीने तिचा फोटो ट्वीट केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी  चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर टीका केली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी राजीनामा देतो आणि परत निवडून येतो,” आदित्या ठाकरेंच्या टीकेला सत्तारांचे प्रत्युत्तर

Aprna

ममता ‘बंगालदुर्गा’ तर पंतप्रधान मोदी ‘महिषासुर’ !

News Desk

माझ्या विनंतीला मान देऊन भाजपने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आभार! – राज ठाकरे

Aprna