बुलडाणा | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज (२४ ऑगस्ट) निधन झाले आहे. जेटलींवर ९ ऑगस्टपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. जेटलींना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्सकडून जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा पुढच्या दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा २६ ऑगस्टपासून पुन्हा ठरलेल्या कार्यक्रमानुसार सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
His contribution for rolling out of GST was immense and this herculean couldn’t be done without a leader like Jaitley ji.
My Heartfelt tributes..
You will keep inspiring us for ever !— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 24, 2019
मुख्यमंत्र्यांनी सभेमध्ये जावून अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहली. मात्र, कुठेही भाषण करणार नाहीत किंवा फुले-सत्कार स्वीकारणार नाहीत, असे मुख्यमंतत्र्यांनी उपस्थितांना सांगीतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “जेटलीजी यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे,” असे ते म्हणाले. मी अतिशय व्यथित आहे, तीव्र दु:खी आहे. अवघ्या एका पंधरवड्यात नियतीने आमचे दोन उमदे नेते हिरावून घेतले आहेत. अगदी काल-परवाच सुषमाजी आमच्यातून निघून गेल्या. असे ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.