HW News Marathi
राजकारण

विधानसभा निकालानंतर बंडखोर, अपक्ष उमेदवारांना मोठे महत्त्व प्राप्त

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता बंडखोरांना तसेच अपक्ष उमेदवारांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला आपला पाठिंबा दर्शविला आहे. तरअमरावतीमधील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे, रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन भाजप-शिवसेनेतील अनेकांनी पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. अशा बंडखोरांना युतीत स्थान दिले जाणार नाही असेही त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्याचप्रमाणे, काही बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली होती. मात्र, आता पक्षही बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अनेक जण विजयी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३ जणांनी भाजपला तर ४ जणांनी शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शविला आहे. निवडणुकीपूर्वी बंडखोरांविरुद्ध कठोर भूमिका घेणाऱ्या शिवसेना-भाजपला आता सत्तेच्या समीकरणांसाठी त्यांच्याच समर्थनाची गरज भासत असल्याचे चित्र आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

News Desk

संतोष बांगरांनी मंत्रालयातील पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण

Aprna

उपोषण मागे, मराठा समाजाचा आंदोलन सुरूच

News Desk