HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसनंतर आता ‘नमो अ‍ॅप’शी संबंधित १५ पेजेसवर देखील कारवाई

मुंबई | आगामी निवडणुकांच्या तोंडावर फेसबुककडून खोट्या बातम्या आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या पेजेसवर कारवाई केली जात आहे. नुकतीच फेसबुककडून काँग्रेसशी संबंधित ६८७ पेजेसवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसप्रमाणेच आता पंतप्रधान मोदी आणि नमो अॅपशी संबंधित एका आयटी कंपनीच्या पेजेस आणि अकाउंट्सवर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. नमो अॅपशी संबंधित असलेल्या ‘सिल्व्हर टच’ या आयटी कंपनीशी संबंधित असलेली १५ पेज आणि अकाऊंट्स फेसबुककडून हटविण्यात आली आहेत.

राजकीय पक्षांच्या समर्थकांकडून या पेजेसच्या माध्यमातून खोटी माहिती आणि खोट्या बातम्या पसरविल्या जातात. म्हणूनच, फेसबुककडून राजकीय पक्षांशी संबंधित पेजेसवर ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पेजेसवरून स्थानिक बातम्या, आगामी निवडणुकांसंदर्भातील राजकीय मुद्दे, उमेदवारांची भूमिका मंडळी जाते. तसेच या पेजेसवरून राजकीय पक्षांवर टीका करण्यात येत असते. म्हणूनच, फेसबुककडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का मदिनेत होणार ?

News Desk

शेतक-यांचे आंदोलन राजकीय आंदोलन नाही | शरद पवार

News Desk

शपथ घेताच कमलनाथ यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ

News Desk