HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

रणजितसिंह यांच्या भाजपप्रवेशानंतर आता धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला असतानाच आता त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे माजी सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. धवलसिंह यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने धवलसिंह यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता आणखी दाट झाली आहे.

धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार राज्यमंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. अकलूज परिसरात धवलसिंह यांची मोठी ताकद आहे. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये धवलसिंह यांनी सदस्य म्हणून काम केले असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. मोहिते-पाटील परिवार भाजपकडे झुकलेला असताना धवलसिंह आणि शरद पवार यांच्या भेटीने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईत तासभर बंद दाराआड झालेल्या चर्चेबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही चर्चा असून धवलसिंह मोहिते पाटील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan

राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत | अटलबिहारी वाजपेयी

News Desk

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पुकारला बंद, वाहतूक विस्कळीत

News Desk