HW News Marathi
राजकारण

पत्राचाळ प्रकरणात नवीन ट्विस्ट; ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

मुंबई | पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Case) ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर 4 हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांचे नावाचा उल्लेख आल्याने पत्राचाळ घोटाळ्यात नवीन वळण आले आहे. ईडीने 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे  परंतु, माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री नेमके कोण? यांचे नाव अद्यापही समोर आले नाही.

2006-2007 या कालावधीमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळीचा विकास करण्यासाठी आणण्यात आले होते. या घोटाळ्यात 1 हजार 34 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणात ज्या घडामोडी घडत होत्या, त्या सर्व गोष्टी राऊतांना माहिती होत्या. या प्रकरणात सारंग वाधवान, राकेश वाधवान आणि प्रवीण राऊत यांना संगनमताने मनी लाँड्रिंग केल्याची माहिती यातून उघड झाली आहे.

प्रवीण राऊत हे राऊतांचे विश्वासू व्यक्त असल्याचे अनेक वेळा स्पष्ट झाले आहेत. प्रवीण राऊतांना म्हाडाशी वाटाघाटी करणे, सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याचे काम सोपविण्यात आले होते. प्रवीण राऊत हे राऊतांचे खास व्यक्ती असल्यामुळे म्हाडाच्या बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांशी विविध फायदे मिळवण्यासाठी त्यांनी संपर्क साधला होता. यानंतर एफएसआय बिल्डरला विकण्यात आले. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रवीण राऊतांचा 25 टक्के हिस्सा होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतींचा जेडीएसला काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला

News Desk

सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली !

News Desk

१९ सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

Aprna