HW News Marathi
राजकारण

टाटा एअर बस प्रकल्पानंतर सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

मुंबई | राज्यात वेदांता-फॉक्सकॉन, बालक ड्रग पार्क, टाटा एअर बस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले आहेत. राज्यातील हे प्रकल्प बाहेर गेल्यामुळे विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक सडकून टीका करत होते.  फ्रान्सची सॅफ्रन कंपनीचा विमान इंजन दुरुस्ती देखभालची प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर म्हणजे हैदराबादला (Hyderabad) गेला आहे. यामुळे विरोधकांना शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकाद टीका होत आहे.

सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प नागपूरमधील  होणार होता. या प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन मिळण्यास दिरंगाई केल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.  सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पासाठी 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पामुळे राज्यातील 500 ते 600 कामगारांचा रोजगार बुडाल्याच्या चर्चा आहेत. राज्यातून प्रकल्पासाठी  कंपनीला जमीन मिळण्यास विलंब होत होता. या पार्श्वभूमी कंपनीच्या सीईओने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.

यापूर्वी राज्यात टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. टाटा एअरबस हा प्रकल्प नागपूरमध्ये होणार होता. परंतु, टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. या प्रकल्पाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस टीकास्त्र सोडले.

 

 

 

Related posts

विधानसभा पार पडेपर्यंत अमित शहाच राहणार भाजप अध्यक्ष ?

News Desk

Lok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान

News Desk

पॉलिटिशन्स पोल, कोण बनविणार सरकार ?

News Desk