HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीत कोण देणार उदयनराजेंना टक्कर ?

मुंबई | राज्यात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष नव्याने पक्षबांधणी करताना दिसून येत आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील पक्ष बांधणीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांच्या महाराष्ट्र वा-या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी कोण कोणत्या विभागातून लढणार ते पाहून लोकप्रियतेची गणित जुळवली जात आहेत. केवळ भाजपच नव्हे तर प्रत्येक पक्षात ही नवी पक्ष बांधणी पहायला मिळत आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शाहीर नितीन बानुगडे पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बानुगडे पाटलांसाठी यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे विद्यमान खासदार आहेत. पक्षातून राजेंना तीव्र विरोध असला तरी ही ते शरद पवारांचे खास असल्यामुळे उमेदवार कोण असणार हे पक्ष प्रमुख या नात्याने शरद पवार ठरविणार आहेत. तर दुसरीकडे भाजप पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.

तसेच सध्या सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख असलेले नितीन बानुगडे पाटील उदयनराजेंना टक्कर देऊ शकतील अशी शिवसेना पदाधिकाऱ्यांना वाटत असल्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस पक्ष प्रमुखांकडे करण्यात आली आहे. मात्र कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय शिवसेनेकडून उद्धव ठाकरे तर राष्ट्रवादी कडून शरद पवारचं घेतील यात तिळमात्र शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शर्मिला ठाकरे आज करणार पुरग्रस्त भागाचा दौरा

News Desk

महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे

News Desk

शेकडो GR अद्यापही शासनाच्या वेबसाईटवर अपलोडच नाही; हजारो कोटीच्या गैरव्यवहाराचा संशय! – प्रविण दरेकर

Aprna