HW News Marathi
राजकारण

अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा फोन, म्हणाले…

मुंबई | कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या औरंगाबादेतील घरावर दगडफेक केली. सत्तारांनी सुळेंवर केल्या आक्षेपार्ह टीकेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी सत्तारांना फोन करून त्यांचे कान टोचले असून मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती माध्यमातून मिळाली आहे.

 

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री सतत करत असलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. मुख्यमंत्र्यांनी वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची बैठक बोलावण्यात सांगितले जात आहे. त्या व्यतिरिक्त बाळासाहेबांच्या शिवसनेतील प्रवक्ते व नेत्यांनी माध्यमांशी संवाद न साधण्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभेच्या परिस्थितीचा आढावा गेले होते. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तारांनी सुप्रिया सुळेवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा  व्हिडिओ व्हायरल झाला.

 

सत्तारांनी वाढता वाद लक्ष्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “माझ्या घरावर कोणी काचा फोडल्या. मला त्याची भीती वाटत नाही. मी आताही बोलू लागलो की, मी महिलांबद्दल आदर करणारा कार्यकर्ता आहे. मी कोणाच्याबद्दल भावना दुखावणारे शब्द मी बोललो नाही. आणि बाकीच्या महिला ज्या असतील, महाराष्ट्रातल्या किंवा देशातीलमहिलांचे कुठेही त्यांचे मन दुखले असतील तर सॉरी.”

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

अब्दुल सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Related posts

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर पैसे मोजावे लागणार !

News Desk

फसणवीस सरकार’राज्यातील जनतेशी ‘ब्ल्यू व्हेल’गेम खेळत आहे ! सचिन सावंत

News Desk

“मातोश्रीचे दरवाजे उघडले, तर परत जाऊ”, संजय राठोड यांचे मोठे विधान

Aprna