HW News Marathi
राजकारण

शिवजयंती निमित्ताने छिंदमसह ७० जणांवर एका दिवसाची शहरबंदी

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला आज (१९ फेब्रुवारी) एक दिवसाची शहरबंदी करण्यात आली आहे. बंदीत छिंदमसह एकूण ७० जणांना एक दिवसाची शहर बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबई पोलीस कायद्याचे कलम १०७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

श्रीपाद छिंदम यांनी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. श्रीपाद छिंदमने पीडब्ल्यूडीच्या एक कर्मचाऱ्यासोबत फोनवर संपर्क साधताना शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर छिंदमवर सर्व स्तरातून सडकून टीका करण्यात आली. याप्रकरणी छिंदमला हद्दपार करण्यात आले. अनेक ठिकाणी छिंदमविरोधात आंदोलनेदेखील करण्यात आली. त्यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

News Desk

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

जी आग तुमच्या मनात आहे तीच माझ्याही मनात !

News Desk