नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी प्रकृतीच्या कारणामुळे दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. माकन यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. मात्र अजूनपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नसल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
अजय माकन यांनी यापूर्वीदेखील महानगरपालिका निवडणुकीमधील काँग्रेसच्या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यावेळी माकन त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता.माकन यांनी १३ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. काँग्रेसने २०१५ साली अजय माकन यांची दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती. अजय माकन हे राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात रवाना झाले आहेत. अजय माकन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे प्रभारी पीसी चाको यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता.
अजय माकन यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे प्रभारी पीसी चाको यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. परंतु ‘अजय माकन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसून प्रकृतीच्या समस्येमुळे ते उपचारांसाठी परदेशात गेले आहेत’, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे.
Delhi Congress President Ajay Maken has not resigned. He has some health issues and has gone for a check-up. He will be back soon. He had recently met party President Rahul Gandhi and party incharge of Delhi affairs PC Chacko: Congress pic.twitter.com/oODU7OLqMY
— ANI (@ANI) September 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.