HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसीमधून काँग्रेसने अजय राय यांना पुन्हा दिली उमेदवारी

वाराणसी | काँग्रेसने उत्तर प्रदेशातील दोन जागांसाठी आज (२५ एप्रिल) उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.बहुप्रतीक्षित अशा वाराणसी लोकससभा मतदार संघातून काँग्रेसने अखेर अजय राय याला उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघातून पूर्व उत्तर प्रदेशाचे महासचिव प्रियांका गांधी वाड्रा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

परंतु काँग्रेसने आज पुन्हा एकदा अजय राय यांना संधी देत मोदींविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरुण सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. २०१४मध्ये देखील अजय राय यांनी मोदींनी विरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु तेव्हा अजय राय यांचा दारून पराभव झाला होता. गोरखपूरमधून मधूसुधन तिवारी निवडणूक लढणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Vidhansabha2019 |अखेर शिवसेनेकडून रश्मी बागल यांना एबी फॉर्म

News Desk

मतदारांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘टॅग मिशन’

News Desk

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

Aprna