HW News Marathi
राजकारण

आगामी निवडणुकांसाठी अखिलेश यादव-मायावती एकत्र येणार ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याविषयी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीमध्ये तत्त्वत: एकमत झाल्याची माहिती समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने दिली आहे. या दोन्ही नेत्यांची शुक्रवारी भेट झाली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात ‘बुआ- भतिजा’ जोडी म्हणजेच अखिलेश यादव आणि मायावती एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या महिन्याच्या शेवटी या आघाडीची औपचारिक घोषणा होईल, अशी माहिती सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

सपा आणि बसपा हे उत्तर प्रदेशातील दोन प्रमुख पक्ष आहेत. या पक्षांच्या आघाडीमुळे भाजपची कसभा निवडणुकीसाठी आखलेली सर्व समीकरणे बिघडू शकतात. अखिलेश यादव आणि मायावती यांच्यात झालेल्या चर्चांनंतर दोन्हीही नेत्यांनी या आघाडीला प्राथमिक होकार दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आघाडीसाठी अन्य पक्षांसोबतही चर्चा सुरू असल्याची माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. या आघाडीत कॉंग्रेसला समावेश असणार का ? असा प्रश्न विचारला असता चौधरी यांनी तो निर्णय अखिलेश यादव आणि मायावती घेतील, असे उत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युद्ध नसताना जवान का शहीद होतात !

News Desk

गोळी लागून पुण्यातील भाजप नगरसेवक जखमी

News Desk

लोढांकडून शिंदेच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्य्रातील सुटकेशी; विरोधकांची टीका

Aprna