HW News Marathi
राजकारण

राफेल घोटाळ्याबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये, काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली | राफेल विमान खरेदी घोटाळ्याबाबत काँग्रेसने भाजप विरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. बहुचर्चित राफेल विमान खरेदी करार घोटाळ्याबाबतची सर्व माहिती मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यामुळे आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यासंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. त्या ऑडिओ किल्पमध्ये “राफेलबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये आहे” असे अभिजीत राणे यांनीसांगितले आहे.

राफेलबाबत निर्धास्त झालेल्या भाजपला पुन्हा झटका

भाजप सरकारने राफेल विमान खरेदी घोटाळ्यातील संपूर्ण माहिती जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेलची सर्व माहिती आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींना त्यांची भीती वाटते का ?, असा प्रश्न देखील काँग्रेसने केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार आक्रमक होत राफेल प्रकरणावरून भाजप सरकारवर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या राफेलबाबतच्या निर्णयानंतर निर्धास्त झालेल्या भाजप सरकारला या कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काँग्रेसकडून पुन्हा एकदा जोरदार झटका देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले केले होते . त्याचप्रमाणे राफेल करारासंदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे पारडे जड

राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर भाजपच पारडे चांगलेच जड झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘राफेलबाबत देशाची दिशाभूल केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी’,अशी मागणी भाजपच्या सर्व नेत्यांकडून केली जात होती. मात्र, तरीही राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत घेऊन राफेलवरून पुन्हा भाजपवर टीका केली होती.

राफेलबाबत मोदी सरकार घेणार देशभरात ७० पत्रकार परिषदा

बहुचर्चित राफेल विमान खरेदी करारबाबत आपली भूमिका संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात तब्बल ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हा’ टॉलिवूड अभिनेता पंतप्रधान मोदींविरोधात लढणार

News Desk

संजय शिंदे यांचा लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश, माढ्यातून उमेदवारी देखील मिळणार ?

News Desk

राहुल गांधींनी घेतले आरएसएसवर तोंडसुख

News Desk