मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटापच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र, शिवसेना-भाजपमध्ये अद्याप युतीच्या जागावापटवर फक्त चर्चा सुरू आहे. निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असे विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.
Shiv Sena's,Sanjay Raut on Maharashtra Min Diwakar Raote's statement 'if Shiv Sena doesn't get half the seats then alliance could break':If 50-50 seat sharing formula was decided upon before Amit Shah Ji&CM,then his statement isn't wrong.Chunaav sath ladenge,kyun nahi ladenge pic.twitter.com/m2fbggbgyt
— ANI (@ANI) September 19, 2019
रावतेंच्या सुरात सुर आवळत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ५०-५० जागा वाटप फॉर्म्युल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे पुढे असे देखील म्हणाले, “रावते जे बोलले ते काही चुकीचे नाही, परंतु निवडणुका सोबतच लढू, असे म्हणत सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने काल (१८ सप्टेंबर) बीड जिल्ह्यातील ५ उमेदवारांची पहिल यादी जाहीर केली.
दरम्यान, शिवसेनेने भाजप समोर लोकसभा निवडणुकी वेळीच समान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या मेगा भरतीमुळे कोणता पक्ष किती जागा वाटून घेणार यावरून सेना-भाजप मध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.