HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये जागावाटपवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एनडीएने बिहारमध्ये जागावाटपवर शिक्कामोर्तब केला आहे. भाजप आणि संयुक्‍त जनता दल प्रत्येकी १७ जागा लढवणार आहेत. यात रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्‍ती पक्षाला ६ जागा देण्यात आल्या आहेत. राज्यात लोकसभेच्या ४० जागा आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर याबद्दलची घोषणा झाली.

गेल्या काही दिवसापुर्वी बिहारमधील प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या एनडीएला बिहारमध्ये गेल्याचे मानले जात होते. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रामविलास पासवान हेही उपस्‍थित होते. यावेळी शहा यांनी लोजप प्रमुख पासवान हे आगामी काळात रालोआकडून राज्यसभेचे उमेदवार असतील असे सांगितले.

राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीतील जागा वाटपावर सन्‍माननिय तोडगा निघाला आहे. आम्‍ही रालोआचा भाग असून पुन्‍हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. आगामी लोकसभेच्या बिहारमधील सर्व जागा राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी जिंकेल, असा विश्वास रामविलास पासवान यावेळी व्यक्‍त केला. आम्ही बिहारच्या विकासासाठी वचनबद्ध आहोत. राम मंदिरबाबत न्यायालय निर्णय देईल, असे मत नितीश कुमार लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपानंतर दिले.

Related posts

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानपरिषदेतील ‘हे’ आहेत लक्षवेधी

Aprna

निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

मला राज ठाकरे यांची सध्याची परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटते !

News Desk