नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लू झाला असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमित शहा यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, आता अमित शाह यांची प्रकृती सुधारत असून पुढच्या एक ते दोन दिवसांत त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती भाजपचे अनिल बलुनी यांनी दिली आहे.
Anil Baluni, BJP: National President of BJP, Amit Shah is doing well. He will be discharged (from AIIMS, Delhi) in a day or two. pic.twitter.com/6jwiLQofOw
— ANI (@ANI) January 17, 2019
एम्स रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एम्स संचालक रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे एक पथकाकडून अमित शहांवर उपचार सुरु आहेत. ”भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती आता सुधारत आहे. येत्या एक ते दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल”, असे अनिल बलुनी म्हणाले.
भाजप नेत्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून हे आजाराचे सत्र सुरू झाले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कॅन्सरने ग्रस्त आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनासुद्धा कॅन्सरचे निदान झाले आहे आणि आता अमित शहांना स्वाईन फ्ल्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अमित शहांचे ट्विट
“मला स्वाईन फ्लू झाला आहे. सध्या मी उपचार घेत असून ईश्वर कृपेने आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच ठीक होईन”, असे ट्विट अमित शाह यांनी केले होते.
मुझे स्वाइन फ्लू हुआ है, जिसका उपचार चल रहा है। ईश्वर की कृपा, आप सभी के प्रेम और शुभकामनाओं से शीघ्र ही स्वस्थ हो जाऊंगा।
— Amit Shah (@AmitShah) January 16, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.