HW News Marathi
राजकारण

सेल्फीचा नाद खुळा

पणजी | सेल्फीच्या नाद अनेक जणांच्या जीवावर बेतला आहे. त्यामुळे सरकारकडून नेहमी सेल्फीच्या नादात स्वत :चा जीव धोक्यात घालून नका असा संदेश दिला जातो. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा सेल्फी काढतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अमृता फडणवीसवर सर्वस्तारातून टीका होता आहे.

मुंबई-गोवा क्रूझ पर्यटन सेवा काल (२० ऑक्टोबर) पासून सुरू करण्यात आली आहे. आंग्रिया असे या क्रूझचे नाव असून भाऊचा धक्का येथून गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात झाली आहे. या क्रूझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सपत्निक हजेरी लावली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. परंतु, त्यांनी सेल्फी काढण्यासाठी चक्क क्रूझचे टोक गाठले आणि अगदी टोकावर बसून सेल्फी घेतला.

या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी त्यांच्या गार्डला काही बोलताना दिसून येत आहेत. तसेच अमृता फडणवीस पुढच्या काही सेकंदांतच आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेताना दिसतात. पण, अमृता फडणवीस यांनी सुरक्षा मोडून हा सेल्फी स्टंट का केला असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Wife of CM amruta fadnavis selfie stunt video on cruise goes viral
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मालमत्तेचे नुकसान व जीवितहानीसारखे गुन्हे वगळता शेतकरी आंदोलकांवरील इतर गुन्हे शासन मागे घेणार! – अजित पवार

Aprna

घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित नाही, मी आहे त्या घरात सध्या तरी खुश – वैभव पिचड

swarit

समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk