HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

आनंद शिंदे, आदर्श शिंदे शिवसेनेतून नव्हे तर “या” पक्षातून निवडणूक लढविणार

धनंजय दळवी, मुंबई | महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे या राखीव मतदारसंघातून आनंद शिंदे निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच आनंद शिंदे नागपूर किंवा सोलापूरमधून तर आदर्श शिंदे हे पिंपरी मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिली आहे.

आनंद शिंदे आणि त्यांच्या मुलाला शिवसेनेतून विधानसभेतून निवडणूक लढवावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑफिर दिली होती. या संदर्भात मातोश्रीवर बैठक झाल्याची माहिती होती. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी पिंपरी आणि मोहोळ या आरक्षित विधानसभा मतदारसंघाचं तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. आनंद शिंदेंनी मात्र त्या बैठकीत आपल्याला निवडणूक लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले होते. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार आणि कोणत्या विधानसभेमधून लढणार हे पहावं लागणार आहे.

Related posts

विरोधकांच्या ‘मारक शक्ती’मुळे भाजप नेत्यांचा मृत्यू !

News Desk

महाविकासआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज होणार सादर

पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणारा आयएएस अधिकारी निलंबित

News Desk