HW News Marathi
राजकारण

…अन् विखे-पाटलांनी विचारले कुठले बटण दाबू …?

शिर्डी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अलीकडेच काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेना उमेदवाराचा प्रचार केल्याने विखे पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. याचे कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. मुलाला तिकीट दिले गेले नाही म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील पक्षावर नाराज होते. आता ही नाराजी ते स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत.

शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावायला आले होते. त्यावेळी ईव्हीएम मशिनजवळ मतदान करायला गेल्यानंतर त्यांनी मिश्किलपणे उपस्थितांना “कुठले बटण दाबू ?”, असा प्रश्न विचारला आणि एकच हशा पिकला. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र शिर्डीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मतदान करण्याचा आधी विचारलेला प्रश्न म्हणजे थट्टेचा विषय बनला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी दिला राजीनामा

News Desk

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

Aprna

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Aprna