HW News Marathi
राजकारण

अन् शरद पवार म्हणतात, अभी तो मै जवान हूं !

कोल्हापूर | “मला ८० वर्षांचा म्हातारा म्हणतात. पण मी काय म्हातारा झालोय का ? अभी तो मै जवान हूं”, या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानानंतर भर प्रचारसभेत उपस्थितांमध्ये हशा पिकला. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे प्रचार आता ऐन रंगात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार हे शुक्रवारी (४ ऑक्टोबर) कोल्हापुरातील राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते. यावेळी शरद पवारांच्या या विधानाला उपस्थितांकडून प्रचंड दाद मिळाली.

“ए वाय पाटील असो, के पी पाटील असो किंवा सतेज पाटील असो ही सर्वच मंडळी अत्यंत मनापासून कामाला लागली आहेत. मला याचा खूप आनंद आहे. मात्र त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. मला ते ८० वर्षांचा माणूस म्हणतात. मी तुम्हाला तिघांनाही सांगतो मला असे म्हणून नका. आता मी काय म्हातारा झालोय ? राज्यातून शिवसेना-भाजपचे सरकार हटविल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. अभी तो मैं जवान हूं. चिंता करण्याचे कारण नाही”, असे शरद पवार म्हणाले. कोल्हापुरातील या प्रचारसभेत शरद पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना BMC निवडणूक एकत्र लढविणार; प्रकाश आंबेडकरांची माहिती

Aprna

नाव छत्रपतींचे, काम अफजलखानाचे

News Desk

२०१९ साल संपण्यापूर्वी राम मंदिराचे काम सुरू करावे !

News Desk