वाराणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२६ एप्रिल) शुक्रवारी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदींनी आजचा दिवस, तारीख आणि खास शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरला आहे. ज्योतिषांचा सल्ला मानला असल्याचे समजते.
#WATCH: PM Narendra Modi files nomination from Varanasi parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ym9x2gCYYG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 26, 2019
अर्ज दाखल करतानाच्या वेळी मोदींसोबतत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंह बादल, लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख राम विलास पासवान भाजपचे सर्व मित्रपक्ष उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे नेते मोदी यांच्याबरोबर जिल्हाधिकारी पोहचले. तेथे सर्व नेत्यांना भेटल्यानंतर मोदींनी अर्ज दाखल केला. यावेळी मोदींनी प्रकाश सिंह बादल यांचे चरणस्पर्श केल्याचे दिसून आले.
#WATCH: PM Narendra Modi meets NDA leaders at Collectorate office ahead of filing his nomination from Varanasi parliamentary constituency. pic.twitter.com/xVfO9kovHP
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 26, 2019
मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी अंतकरणापासून काशीच्या समस्त जनतेचे अभिवादन करतोय. त्यांनी मला गेल्या पाच वर्षापासून भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून अभारी आहे. काल (२५ एप्रिल) जो भव्य दिव्य रोड शो पार पडलेला हे फक्त काशीमध्येत शक्य होऊ शकते. बनारस हिंदू विद्यापीठाजवळील पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्यापासून पंतप्रधान मोदींनी तब्बल ७ किलोमीटरचा भव्य रोड शो काढून मोठे शक्तिप्रदर्शन केले.
जनतेला मतदान करण्याचे आवाहन
काही लोक असे वातावरण निर्मिती करत आहे की, मोदी तर जिंकणार आहे. मग त्यांना मत देण्याचे काही जर नाही. अशा लोकांनपासून तुम्ही सावधान राहा. मतदान हा तुमचा हक्क आहे. हा लोकशाहीचा उत्सव आहे. यात देशाला मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला केला आहे.
PM Narendra Modi: Aisa mahaul kuch log ab banane lage hain ki Modi ji toh jeet gaye aur vote nahi karoge toh chalega. Kripa karke aise logon ki bataon mein mat aiye. Matdaan apka haq hai, loktanta ek utsav hai, zada se zada matdaan karna chahiye desh mazboot karne ke liye. pic.twitter.com/EqY6ztfi2u
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.