HW News Marathi
राजकारण

राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का? अजित पवारांचा ‘ईडी’ सरकारला संतप्त सवाल…

मुंबई | “ही कामे कर्नाटक की गुजरातमधील आहेत का?”, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी करत ईडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी अजित पवार यावेळी एकदम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… स्थगिती सरकार हाय हाय…५० खोके एकदम ओके… अशा घोषणांनी सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.

विधीमंडळाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये बॅनरबाजी आणि घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दोन्ही पक्षांनी हातात बॅनर घेऊन एकमेकांविरोधा घोषणा देत होते. विरोधकांनी “५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या”, अशा घोषणा दिल्या. तर सत्ताधाऱ्यांनी “50 आमदार एकदम ओके घरी बसवले माजलेले बोके”, असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली आहे.

संबंधित बातम्या

सत्ताधाऱ्यारी-विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून घटकपक्षांना विश्वासात घेतले जात नाही !

News Desk

मोदींनी दिला जय अनुसंधानचा नारा

News Desk

राजेश कुंटेंच्या याचिकेवर 10 ऑगस्टला होणार सुनावणी

News Desk