HW News Marathi
राजकारण

अरुण गवळीला हवी २८ दिवसांची संचित रजा

मुंबई | मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयात कुटुंबियांना भेटण्याकरिता २८ दिवसांच्या संचित रजेची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी देऊन कारागृह विभागाला नोटीस बजावली आहे. अरुण गवळी हे सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

गवळीने याआधीही तुरुंगात असताना अनेक कौटुंबिक कारणांसाठी संचित किंवा फर्लो रजा घेतली आहे. आता पुन्हा कुटुंबियांसाठी मुंबई उच्च नायायालयात २८ दिवसांची संचित रजा मिळावी, यासाठी पुन्हा अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांकडे हा अर्ज करण्यात आला होता. मात्र, आयुक्तांकडून हा अर्ज फेटाळण्यात आल्याने गवळीने आता मुंबई उच्च न्यायालयात ही मागणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उध्दव, राज व आंबेडकर यांची निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

News Desk

राज ठाकरे महाआघाडीसाठी हातकणंगले-सांगली मतदारसंघात घेणार सभा ?

News Desk

गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

News Desk