चेन्नई | “काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यास हवे, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. शहांनी आज (११ ऑगस्ट) राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
#WATCH Amit Shah:As a legislator,I firmly believe Art370 should’ve been removed long ago. As a Home Minister,there was no confusion in my mind about the consequences of removing Art370. I’m confident terrorism in Kashmir will finish&it’ll move ahead on the path of development now pic.twitter.com/YWyW5xJJs1
— ANI (@ANI) August 11, 2019
या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलताना म्हटले की, “काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यास हवे. गृहमंत्री म्हणून माझ्या डोक्यात अनुच्छेद ३७० हटविण्याबद्दल कोणताही गोंधळ नव्हता. मला विश्वास आहे, हे हटविल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी नष्ट होतील, आणि राज्य विकासाच्या दिशेने वाटचाल करेल असा, विश्वास शहांनी व्यक्त केला होता.
Chennai: Union Home Minister, Amit Shah today released the book ‘Listening, Learning and Leading’ on Vice-President Venkaiah Naidu’s two years in office. pic.twitter.com/BAPvLoWXov
— ANI (@ANI) August 11, 2019
अमित शहा यांनी व्यंकय्या नायडू यांचे आभार मानले आहेत. ‘राज्यसभेत आमचे पूर्ण बहूमत नाही त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की पहिल्यांदा ते राज्यसभेत मांडू त्यानंतर ते लोकसभेत मंजूर करुन घेऊ. त्यावेळी नायडू यांनी राज्यसभेत विधेयक मांडल्यानंतर या वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा घसरू दिली नाही. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो’ असे देखील अमित शहा यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.