HW News Marathi
राजकारण

बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड | चंदन तस्करांना आय.पी.एस पंकज कुमावत यांनी चांगला दणका दिला आहे. बीडच्या महाजनवाडी गावातून तब्बल 599 किलो चंदनाच्या गाभ्यासह जवळपास 20 लाख 72 हजरांचा ऐवज जप्त केला आहे. बीडच्या महाजनवाडी गावातील काही जण चंदनाची तस्करी करत असून त्यांनी शिवारातील शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणले आहेत आणि आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा काढून चोरटी विक्री करत आहेत, अशी माहिती आयपीएस कुमावत यांना मिळाली होती.

पोलिसांकडन मिळालेल्या माहितीनुसार पंकज कुमावत यांच्यासह टीमने महाजनवाडी गावात छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा अशोक रामहारी घरत रा . महाजनवाडी हा मिळून आला. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता, 499 किलो चंदनाचा तासलेला गाभा , लाकडे वजन काटा वाकस व कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला.

दरम्यान याप्रकरणी चंदन तस्कर अशोक घरत याच्यासह 10 जणांविरुद्ध बीडच्या नेकनूर ठाण्यात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने चंदन तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ, आता तरी आत्मचिंतन करा !

News Desk

उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर जारी

Seema Adhe

“राष्ट्रवादीचा एक मोठा नेता लवकरच देशमुख आणि मलिकांना भेटणार”, कंबोज यांचे खळबजनक ट्वीट

Aprna