HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आधी मला अवघड वाटत होतं मात्र आता यश आपलंच याची खात्री !

पुणे | “मी आठ जिल्ह्यात जाऊन आलो. आधी मला वाटत होतं कि ही निवडणूक अवघड आहे. परंतु, आता यश आपलंच याची खात्री झालीय”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी ट्विट करत हा विश्वास व्यक्त केला आहे.

“सत्ताधारी पक्षांकडे फक्त पैसे आहेत मात्र सांगण्यासारखे काहीच नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना खाजगीत सांगा कि उगाच आता मिळालेले पैसे खर्च करू नका. कारण, परत पैसे मिळतील की नाही माहीत नाही”, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. “पुणे हा देशाला दिशा देणारा मतदारसंघ असल्याने ही निवडणूक नेहमीच”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

Related posts

स्मारकांसाठी खर्च केलेले जनतेचे पैसे परत करा, मायावतींना न्यायालयाचा धक्का

News Desk

साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात एनआयए न्यायालयात याचिका दाखल

News Desk

बुजुर्ग आडवाणी यांचा अपमान झाल्याची छाती पिटण्याची निदान काँग्रेसला गरज नाही !

News Desk