HW News Marathi
राजकारण

शिवसेनेची अयोध्यावारी ही राजकीय चूक ?

मुंबई | १९९० मध्ये भारतीय जनता पार्टीने एल.के अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदीर उभारणीसाठी सोमनाथ ते अयोध्या अशा रथ यात्रेचे आयोजन केले होते. या रथ यात्रेचा मुख्य उद्देश विश्व हिंदू परिषद आणि संघ यांच्या भव्य असे राम मंदीर उभारणीच्या मागणीला पाठींबा देणे असा होता. पुढे ६ डीसेंबर १९९२ ला कारसेवकांनी बाबरी मस्जिद पाडली. त्यामुळे एक सामाजिक तणाव निर्माण झाला. मात्र याच वेळेस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ” जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. ” असे म्हणत देशपातळीवर हिंदुत्ववादी नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली. परिणामी भाजप आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात संयुक्त सरकार प्रस्थापित करणे शक्य झाले.

१९९२ साली राम जन्मभूमीचा मुद्दा राजकीय हवा तापविण्यासाठी लागू पडला तो २०१८ मध्ये तो शिवसेनेला तितकासा उपयोगी पडला नाही. म्हणजेच राम मंदिर प्रश्नावर १९९२ साली ज्या पद्धतीने सेना भाजपाने आपली पोळी भाजून घेतली होती. ते आता सेनेला शक्य झाले नाही. याचा मोठा फटका शिवसेनेला बसला विषेश म्हणजे ज्या दौ-याचा गेल्या दोन महिन्यांपासून गवगवा होता तो अयोध्या दौरा ठाकरेंनी अवघ्य़ा २४ तासात गुंडाळला. अयोध्या दौ-यासाठी विषेश ट्रेनने अयोध्येला गेलेल्या शिवसैनिकांना पहिल्याच दिवशी विषेश ट्रेनने परतावे लागले. त्यानंतर अयोध्येत असलेल्या शिवसैनिकांमध्ये देखील तितकासा उत्साह दिसला नाही. हे अयोध्येत उपस्थित असलेल्या HW मराठी न्यूजच्या प्रतिनिधींना प्रखरशाने जाणवले.

भाजपाला शिवसेनेच्या आयोध्या वारीचा फायदा

प्रथम दर्शनी भाजपाची कोंडी करण्यासाठी आखलेल्या आयोध्या वारीचा फायदा भारतीय जनता पक्षाला जास्त प्रमाणात झाला. सेनेच्या अयोध्या दौ-यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दोन महिने एकंदरीत सर्वांचे दुर्लक्ष झाले. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या आयोध्या वारीवर सोईस्करपणे प्रतिक्रीया देणे टाळले. तसेच मित्र पक्ष असलेल्या शिवेनेच्या अयोध्या दौ-याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे बाळासाहेबांच्या काळात भारतीय जनता पार्टी समोर मोठ्या भावाची भूमिका घेणारी शिवसेना सध्या महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना दुर्लक्षित घटक ठरली. राम नाम लिहताचं दगड देखील पाण्यावर तरल्याचा पुराणात उल्लेख आहेत. मात्र राम नामाचा फायदा सेनेला कितपत होईल यात शंकाच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात सेना भाजपाचा लहान भाऊ म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर आश्चर्य वाटायला नको.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

News Desk

बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Aprna

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची ‘मविआ’ सरकारवरील टीका खोटी आणि दिशाभूल करणारी! – अजित पवार

Aprna