HW News Marathi
राजकारण

बाळासाहेबांनी माझ्यावर उद्धवपेक्षा जास्त प्रेम केले !  

मुंबई | माझ्या भाजप प्रवेशात शिवसेनाच अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही. शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ताच उरलेली नाही, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीकरिता नारायण राणे हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तशी घोषणाच त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर केली होती. मात्र, आपल्या या भाजपप्रवेशात शिवसेना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केले आहे. ते पुण्यात आयोजित ‘युवर्स ट्रूली नारायण राणे’ या कार्यक्रमात बोलत होते.

नारायण राणे ३० ऑगस्ट रोजी आपला ‘महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष’ भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली होती. येत्या १ सप्टेंबरला गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आपण आपला पक्ष भाजपमध्ये करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश देखील भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, अद्याप नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष’ भाजपमध्ये विलीन झालेला नाही. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेदरम्यान देखील स्वतः नारायण राणे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांसमोर केली होती. मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यास कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिला नाही.

बाळासाहेबांनी उद्धवपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केले !

“बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर उद्धवपेक्षा जास्त प्रेम केले. शिवसेनेत असताना आम्ही जेवढी आंदोलने केली आहे त्याबाबत उद्धव ठाकरेंना माहित देखील नसेल. मी शिवसेनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतही सर्वाधिक लोकप्रिय होतो. मात्र, आताची शिवसेना व्यावसायिक बनली आहे. शिवसेनेच्या आमदारांना नीतिमत्ता उरलेली नाही”, असे नारायण राणे म्हणाले. त्याचप्रमाणे, “उद्धव ठाकरेंना काहीही चांगले दिसत नाही. एखाद्या चांगल्या व्यक्तीचे त्यांना कौतुकही करवत नाही”, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

आम्ही इतके स्वस्त नाही, काँग्रेसने ‘त्या’ ३ जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर लढणार !

News Desk

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna