मुंबई | माझ्या भाजप प्रवेशात शिवसेनाच अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आता राहिली नाही. शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ताच उरलेली नाही, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीकरिता नारायण राणे हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तशी घोषणाच त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर केली होती. मात्र, आपल्या या भाजपप्रवेशात शिवसेना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केले आहे. ते पुण्यात आयोजित ‘युवर्स ट्रूली नारायण राणे’ या कार्यक्रमात बोलत होते.
बाळासाहेबांनी उद्धवपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केले !
“बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर उद्धवपेक्षा जास्त प्रेम केले. शिवसेनेत असताना आम्ही जेवढी आंदोलने केली आहे त्याबाबत उद्धव ठाकरेंना माहित देखील नसेल. मी शिवसेनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतही सर्वाधिक लोकप्रिय होतो. मात्र, आताची शिवसेना व्यावसायिक बनली आहे. शिवसेनेच्या आमदारांना नीतिमत्ता उरलेली नाही”, असे नारायण राणे म्हणाले. त्याचप्रमाणे, “उद्धव ठाकरेंना काहीही चांगले दिसत नाही. एखाद्या चांगल्या व्यक्तीचे त्यांना कौतुकही करवत नाही”, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.