HW News Marathi
राजकारण

बाळासाहेब ठाकरेंनी देखील राज्यसभेसाठी ऑफर दिली होती | कुमार केतकर

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९८ साली आपल्याला राज्यसभेसाठी संधी दिली होती. परंतु शिवसेनेच्या भूमिकेशी मी सहमत नसल्याने ती ऑफर नाकारल्याची स्पष्टोक्ती ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी दिली.

राज्यसभेवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर कुमार केतकर यांनी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात पत्रकार परिषद घेऊन आपल्या निवडीबाबत भूमिका स्पष्ट केली. महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान आणि पंडित नेहरू यांच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव असून त्यांना आपण मानतो.

माझ्या पत्रकारितेत कधीही माझी वैयक्तिक भूमिका आलेली नाही. मी २५ वर्षे वार्ताहर म्हणून काम केले तर ४० वर्षे पत्रकार म्हणून काम करत आहेत. परंतु माझ्या वैयक्तिक भूमिकेचा बातमीत कधीही समावेश झालेला नाही. परंतु जेव्हा पत्रकार एखाद्या घटनेवर भाष्य करतो किंवा लेख लिहितो, तेव्हा त्याची भूमिका किंवा विचारांचा त्या लेखावर प्रभाव येतोच.

त्यामुळे पत्रकार कधीच भूमिकाहीन नसतो, नसावा असे मत केतकर यांनी मांडले. त्यामुळे मला कॉँग्रेसकडून जरी उमेदवारी मिळाली असली तरी माझ्या कामात कधीही कॉँग्रेसविरोधात बातम्या आलेल्या नाही, असे घडले नाही. पत्रकारांनी राजकारणात जावे किंवा राज्यसभेवर जावू नये, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

एखाद्या घटनेवर भाष्य करताना पत्रकारांचा पक्षपातीपणा दिसून येतो, कारण तो त्यांच्या अनुभवावरून तो संबंधित लेख लिहित असतो. त्यामुळे पत्रकार कधीच बायस वैगरे नसतो. १९९८ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला राज्यसेभेची ऑफर दिली होती.

त्यावेळी तिघेजण माझ्यासोबत होते. परंतु बाळासाहेबांनी मला माझी भूमिका सोडण्याची विनंती केली होती, ती सोडण्यास मी नकार दिला व उमेदवारीही नाकारली. तरीही बाळासाहेब व शिवसेनेसोबत माझे संबंध कायम सलोख्याचे राहिले, असेही केतकर यांनी नमूद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…हिंगोली मतदारसंघाबाबत

News Desk

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

News Desk

ठाण्यातील किसननगर भागात शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

Aprna