जयपूर | राजस्थानातील किशनगंज विधानसभा मतदारसंघात शाहबाद परिसरात भर रस्त्यात एक बॅलेट युनिट सापडले आहे. बॅलेट युनिट प्रकरणी कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता मोठया प्रमाणावर निष्काळजीपणा दाखविण्यात आला आहे. त्यामुळेच २ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या हे बॅलेट युनिट किशनगंजच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
#WATCH: A ballot unit was found lying on road in Shahabad area of Kishanganj Assembly Constituency in Baran district of Rajasthan yesterday. Two officials have been suspended on grounds of negligence. #RajasthanElections pic.twitter.com/yq7F1mbCFV
— ANI (@ANI) December 8, 2018
दरम्यान, राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर देखील भाजप नेत्याच्या घरात ईव्हीएम मशीन सापडल्याची माहिती सोशल मीडियावर पसरल्यानंतर काहीच वेळात याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचप्रमाणे छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात स्ट्राँग रुमच्या परिसरात लॅपटॉप घेऊन गेल्या प्रकरणी पोलिसांनी ३ तरुणांना अटक केली. तर २ सुरक्षा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.