HW News Marathi
राजकारण

मुघल आक्रमणापूर्वी ‘हिंदू’ हा शब्दच अस्तित्त्वात नव्हता !

नवी दिल्ली | “हिंदू हा शब्द मुघल आणि परकीय आक्रमणापूर्वी अस्तित्त्वातच नव्हता”, असे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य मक्कल निधी मियाम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी केले आहे. कमल हसन यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कमल हसन यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद अजूनही शमलेला नसताना आणखी एक वक्तव्य करत हसन यांनी या वादात भर घातली आहे. यापूर्वी “नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता”, असे वादग्रस्त वक्तव्य हसन यांनी केले होते.

“कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. परकीय आणि मुघल आक्रमणानंतर हिंदू हा शब्द आलेला आहे. त्यामुळे परकीयांनी दिलेली ही ओळख जपण्यापेक्षा आपण भारतीय ही ओळख जपली पाहिजे”, असे कमल हसन त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. “हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणे अयोग्य आहे. आपण सर्वजण भारतीय आहोत. भारतीय अशीच आपली ओळख असली पाहिजे. हिंदू हा शब्द ब्रिटिशांच्या राजवटीत प्रचलित केला गेला”, असेही त्यांनी म्हटले आहे. कमल हसन यांनी तामिळ भाषेत हे ट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल डीलची ऑडिओ क्लिप खरी | राहुल गांधी

News Desk

अमित शहा यांची रथयात्रा पुन्हा अडली

News Desk

मला नाव कमाविण्यापेक्षा सर्वसामान्यांचे आशीर्वाद कमवायचे आहेत !

News Desk