HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : आरक्षणाआधीच भाजपला श्रेय लाटण्याची घाई

मुंबई | अखेर मराठा आरक्षणाचा एटीआर आज विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात विधानभवनात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. आजची ही बैठक ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बैठक ठरणार आहे. या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा एटीआर सभागृहात मांडण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने संपूर्ण राज्यात आणि विधानभवनात मराठा आरक्षणासाठीच्या जल्लोष साजरा करण्याची तयारी केली आहे.

मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर लगेच भाजपचे आमदार भगवे फेटे परिधान करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार असून विधानभवनाच्या परिसरातही मिठाई वाटून जल्लोष फेरी काढण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. भाजपची ही तयारी पाहता मराठा समाजाच्या आरक्षणाचे संपूर्ण श्रेय लाटण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता आरक्षणाआधीच भाजपकडून वातावरण निर्मितीचे प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात विधीमंडळात आज नेमके काय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘ये दोस्ती आगे भी चलती रहेगी’, तेजस्वी यादव यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

News Desk

पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात !

News Desk
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (२८ नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्‍या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि काही शस्‍त्रे जप्त करण्यात आली आहेत.

गेल्‍या पाच ते सहा दिवसांपासून दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्या चकमकी सुरू आहेत. गेल्‍या सहा दिवसांत भारतीय लष्‍कराने २२ दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय हद्दीत जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याच्या प्रयत्नात असल्‍याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

बुधवारी बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटला कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमधील ‘रायझिंग काश्मीर’ वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता.

Related posts

दहशतवाद्यांनी केले काश्मीरमधील पोलिसांच्या नातेवाईकांचे अपहरण

swarit

कश्मीरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

News Desk

काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार कुमार केतकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

News Desk