HW News Marathi
राजकारण

भूमिपूजनापूर्वीच शिवस्मारकाच्या खर्चात १००० कोटींची वाढ

मुंबई | अरबी समुद्रात उभारण्यात येणारे शिवस्मारक वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. या शिवस्मारकाचे अद्याप भूमिपूजन देखील झालेले नसताना आता या स्मारकाच्या खर्चात तब्बल १००० कोटींची वाढ करण्यात आली आहे. शिवस्मारकासाठी २ हजार ६९२ कोटी एवढा प्रकल्प खर्च अपेक्षित होता. मात्र आता शिवस्मारकाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या विलंबामुळे याची किंमत वाढून आता तब्बल ३६०० कोटींवर पोहोचली आहे.

शिवस्मारकाच्या बांधकाम खर्चात थेट १००० कोटी रुपयांनी वाढ झाल्याने चर्चा आणि टीकांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या १००० कोटींपैकी शिवस्मारकाच्या सुरक्षा व्यवस्थेत २३६ कोटी, पाणी आणि वीज व्यवस्थेत ४५ कोटी, आकस्मिक निधीत ११२ कोटी तर संगणकीकरणात ५६ कोटी इतकी वाढ झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटचा अपघात झाला होता. अद्याप या अपघाताची चौकशी देखील पूर्ण झालेली नाही. त्याचप्रमाणे, या स्मारकाचे भूमिपूजन देखील झालेले नाही. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शिवस्मारकाला भेट देण्याऱ्या पर्यटकांकडून ३६०० कोटी रुपये प्रकल्प खर्च ‘पर्यटन शुल्का’च्या स्वरूपात वसूल करण्याबाबत सरकारचा विचार सुरु होता, अशी माहिती समोर येत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इसिसने जाळे विणले कसे?

News Desk

शरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात !

News Desk

राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप, हिंदूंनी सावध राहावे!

swarit
राजकारण

उपेंद्र कुशवाहा यांचा एनडीएला रामराम तर यूपीएमध्ये प्रवेश

News Desk

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधून बिहारमधील प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा एनडीएमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भाजपच्या एनडीएला बिहारमध्ये मोठा तडा गेला आहे. कुशवाहा यांनी काँग्रेसप्रणित यूपीएशी हात मिळवणी केली आहे. कुशवाहा यांनी संदर्भात दिल्लीतील काँग्रेस कार्यलयात बैठक झाली. यानंतर कुशवाहा यांनी महाआघाडीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे बिहारमधील भाजपाचा एक मित्रपक्ष कमी झाला आहे.

थोड्याच वेळापूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला उपेंद्र कुशवाहा यांच्यासह बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी उपस्थित होते. या बैठकीनंतर कुशवाहा यांनी आपण महाआघाडीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. ‘माझ्याकडे बरेच पर्याय होते. परंतु काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मी यूपीएचा भाग होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुशवाहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुशवाहा यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कुशवाहा यांचे महाआघाडीत स्वागत करत मोदींवर निशाणा साधला. ही देश आणि संविधान वाचवण्याची लढाई असल्याचे ते म्हणाले. ‘सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. पंतप्रधान मोदींची हुकूमशाही करत आहेत. ज्यांनी जनतेचा फक्त आणि फक्त विश्वासघात केला, दिशाभूल केली, त्यांना जनता जोरदार प्रत्युत्तर देईल,’ अशी टीका यादव यांनी केली.

Related posts

दोन वर्षांनंतर छगन भुजबळ विधानभवनात दाखल

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशने वैध

Aprna

‘महाविकासाआघाडी’ने स्पष्ट केली ‘किमान समान कार्यक्रमा’ची रूपरेषा

News Desk