HW Marathi
राजकारण

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या शुभेच्छा

मुंबई | २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. परंतु आगामी निवडणुकीत ४३ जागा भाजप जिंकणार आणि ४३वी जागा ही बारामतीची असणार, असा विश्वास शनिवारी ( ९ फेब्रुवारी) देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केला आहे. यंदाच्या निवडणुकीत बारामतीत भाजपचे कमळ फुलणार असा दावा मुख्यमंत्री केला आहे. तसेच बारामती जिंकण्याची आकांक्षा पुर्ण होण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि ४३ जागाच का तर त्यांनी पुर्ण ४८ जागांवर विजय मिळवण्यासाठी तयारी करावी असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

तसेच पुढे पवार असे देखील म्हणाले की, जपकडून होणाऱ्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांनी अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांचाही समाचार घेतला.भाजपकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांना फारसे गांभिर्याने घेण्याची गरज नाही. आज (१० फेब्रुवारी) पुण्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी बारामती लोकसभेची जागा जिंकण्याची वल्गना केली. त्या वल्गनेची राष्ट्रवादी काँग्रेसने चेष्ठा केली आहे.

चार राज्यांत फटका बसल्यानंतरही स्वप्नरंजनातून बाहेर निघण्यास भाजप काहीतयार नाही. आता बारामती जिंकण्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाहून पोट फुगवणाऱ्या बेडकीच्या गोष्टीची आठवण होते, अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नांचा फुगा फोडल्याशिवाय मतदार राहणार नाहीत, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. हाताची घडी तोंडावर बोट, हसून हसून आमचे दुखतेय पोट, अशा मिश्किल शब्दात पवारांनी भाजपवर निशाना साधला आहे.

काहींना या निवडणुकीत मुला-बाळांना स्थिरस्थावर करायचे आहे, अशा शब्दात त्यांनी पवार कुटुंबातील घराणेशाहीवर नाव न घेता भाष्य केले आहे. पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे बारामतीतून लढतील. तर शरद पवार माढ्यातून लढणार असल्याचं कळतेय. याशिवाय पवारांचे नातू पार्थ पवार यांची मावळ तर दुसरे नातू रोहित पवार यांची शिरुर लोकसभा मतदारसंघातून नावे चर्चेत आहेत.

 

Related posts

सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी

News Desk

मोदींनी साईबाबा मंदिरातील पुस्तकात काय लिहिले ?

अपर्णा गोतपागर

राजस्थानमध्ये भर रस्त्यात सापडले बॅलेट युनिट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

News Desk