HW Marathi
राजकारण

दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीबरोबरच चार राज्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी भाजपने आज (२१ मार्च)  अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  अरुणाचल प्रदेशमधील १२ तर सिक्कीममधील ६ उमेदवारांचा यादीत समावेश आहे. भाजपच्या निवडणूक समितीची आज नवी दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत उमेदवरांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

भाजपने विधानसभा उमेवारांची यादी जाहीर केली असली तर, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादी अद्याप जाहीर केली नाही. भाजपाने जवळपास २५० उमेदवारांची यादी तयार केली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अन्य बड्या नेत्यांची नावे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Related posts

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar

 शरद पवारांच्या सभेला अखेर परवानगी

Ramdas Pandewad

कावेबाज चीनचा भारताला सर्व बाजूंनी विळखा घालण्याचा प्रयत्न | ठाकरे

News Desk