HW Marathi
राजकारण

लोकसभेबरोबरच ४ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा, जम्मू-काश्मीरवर सस्पेंस

नवी दिल्ली | निवडणूक आयोग आज (१० मार्च) सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीची तारखा आणि वेळापत्रक जाहीर होणार आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणूक ७ ते ८ टप्प्यातील होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, सिक्किम, ओडिसा आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यातील विधानसभा निवडणुकाची वेळापत्रक घोषणा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होणार किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झाला नाही. जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त होऊन ६ महिन्यांच्या कालावधीत विधानसभा निवडणुका घोषित कराव्या लागणार आहे. येत्या मे महिन्यात हा कालावधी समाप्त होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका या लोकसभासोबतच घोषित होण्याची शक्यात वर्तविली जात आहे. परंतु भारत-पाक सीमेवरील वाढत्या तणावामुळे निर्माण झालेली सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल असे दिसते.

 

Related posts

डॉ. पायल तडवी यांचे आई-वडील घेणार मुंबई उच्च न्यायालयात धाव

News Desk

केजरीवाल यांच्यावर अज्ञात व्यक्तीने मिरचीपूड फेकली

News Desk

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

News Desk