पाटणा | देशात पाचव्या टप्प्यासाठी आज (६ मे) मतदान सुरू झाले आहे. मतदानादरम्यान ईव्हीएम मशीन फोडण्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सारण लोकसभा मतदारसंघात घडला आहे. या मतदारसंघातील छपरा १३१ नंबर मतदान केंद्रावर ही ईव्हीएम मशीन फोडल्याने एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती.
Bihar: One Ranjit Paswan arrested on charges of vandalizing an EVM machine at polling booth number 131 in Chhapra. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/0mqrXc4mjT
— ANI (@ANI) May 6, 2019
या प्रकरणी रणजित पासवान याला स्थानिक पोलिसांनकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. बिहारमधल्या पाच लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहेत. सारण या लोकसभा मतदारसंघात एनडीए आणि महागठबंधन यांच्या निवडणुकीचा सामना रंगला आहे. महागठबंधनच्या वतीन लालूंचे नातेवाईक चंद्रिका राय हे उमेदवार असून एनडीएकडून राजीव प्रताप रुडी निवडणुकीच्या मैदानात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.