HW News Marathi
राजकारण

शरद पवारांनी मतांच्या राजकारणासाठी कलम ३७० हटविण्यास विरोध केला !

सोलापूर । आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपापल्या जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र भाजपच्या प्रचारासाठी खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे राज्यभरात एकूण १२ सभा घेणार आहेत. यांपैकी अमित शाह यांची पहिली सभा आज (१० ऑक्टोबर) सांगली येथील जतमध्ये झाली. यावेळी बोलताना अमित शाह काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबाबत भाष्य केले आहे.

अमित शहांच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे :

• एकीकडे शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविण्यास सज्ज होत आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस -राष्ट्रवादीसारखे परिवारवादी पक्ष आहेत.

• आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने पंतप्रधान मोदींच्या झोळीत कमळच कमळ भरून टाकले.

• पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच सत्राच्या आत मोदींनी एक ऐतिहासिक प्रस्ताव मांडला. तो प्रस्ताव होता काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याचा

• देशातील जनता गेली ७० वर्षे अशा एका साहसी नेत्याची वाट बघत होती.

• पंतप्रधान मोदींनी काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून देशाला एकसंघ, अखंड, महान बनविले आहे.

• देशभरातील जनता आता हे मानते की आता काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे.

• जेव्हा मोदींजींनी कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काय करत होते ? तर हे दोन्ही पक्ष कलम ३७० हटविण्याची विरोध करत होते, मोदींजींचा विरोध करत होते.

• शरद पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे की, तुम्ही कलम ३७० हटविण्याच्या बाजूने आहात की विरोधात ?

• शरद पवार तुम्ही कलम ३७० हटविण्याच्या प्रस्तावाला, काश्मीरला भारताचे अभिन्न अंग बनविण्याला विरोध का केला होता ? तुम्ही याचा विरोध केला कारण तुम्हाला मतांचे राजकारण करायचे होते.

• माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापुढे जाऊन म्हटले की काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील.

• मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की, ५ ऑगस्टला कलम ३७० रद्द केले आता ५ ऑक्टोबर उलटून गेले. पण काश्मीरमध्ये रक्ताचे पाट तर सोडाच एक गोळी देखील झाडावी लागली नाही. संपूर्ण काश्मीर शांत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काय लायकी तरी हाय का? उंची किती, डोकं केवढं”, विनायक राऊतांची नारायण राणेंवर जहरी टीका

Darrell Miranda

“नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही शिंदेंना ठाकरेंनी सुरक्षा का नाकारली,” सुहास कांदेंचा सवाल

Aprna

स्टॉलच्या वादातून शिवसैनिकांनी केली उत्तर भारतीय तरुणाला मारहाण

News Desk