May 24, 2019
HW Marathi
राजकारण

भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का

मुंबई | ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. भाजपचे नेते व एन्काउंटर फेम माजी पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रविंद्र आंग्रे हे भाजपचे नेते आणि मोठे सनदी अधिकारी होते. तर मुनाफ हकीम हे राष्ट्रवादीचे नेते होते. मात्र त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे भाजप आणि राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Related posts

दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आज थंडावणार

News Desk

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर

News Desk

मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करायचे असतील तर पैसे मोजावे लागणार !

News Desk