HW News Marathi
राजकारण

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भोपाळ | मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज (२२ एप्रिल) अर्ज दाखल केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रा त्यांच्याकडे साडेचार लाख रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. यात च्याकडे चांदीचे ताट, ग्लास, पेला आणि कमंडलू यासह सोन्याची चेन आणि अंगठी आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे चार लाख ४४ हजार २२४ रुपये इतकी संपत्ती आहे. त्यामध्ये ९० हजार रुपयांची रोकड आणि दोन बँक खात्यांमध्ये ८८ हजार ८२४ आणि ११ हजार रुपये जमा आहेत. साध्वी यांचे कोणत्याही कंपनीत शेअर्स नाहीत. तसेच त्यंच्या नावावर गाडी किंवा जमीन नाही.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे ४८ हजार रुपयांची एक सोन्याची चेन, १६ हजार रुपयांची अंगठी, ८१ हजार रुपये किंमतीचे चांदीचे कमंडलू, तसेच चांदीची थाळी, चार चांदीचे ग्लास, एक चांदीचा पेला, पायातल्या चांदीच्या रिंग्स आणि श्रीरामाचे नाव लिहिलेली एक चांदीची प्लेट या सर्वांची किंमत मिळून ४ लाख ४४ हजार २२४ रुपये आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी स्वतः ‘झेडपी’च्या शाळेत शिकलो, शरद पवारांकडून शालेय आठवणींना उजाळा

News Desk

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही अधिकृत घोषणेआधीच कमलनाथ यांचे अभिनंदन

News Desk

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna