HW Marathi
राजकारण विधानसभा २०१९

पुण्यात सर्व जागांवर भाजपचा दावा, मग शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का ?

पुणे | आगामी विधानसभेच्या दृष्टीने शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरूच आहे. दरम्यान, काही मतदारसंघांमध्ये मात्र शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचे दिसून येत आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्याच्या 8 ही जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मग आता शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का ?”, असा संतप्त सवाल शिवसेना नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. “पुण्यातील विधानसभा जागांवरुन भाजप-शिवसेनेत वाद होण्याची चिन्हे आहेत”, असेही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

“भोसरी मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार आणि आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभेतही युती असल्यास भोसरीची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी”, असे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरीच्या जागेवर दावा सांगितला आहे. “भोसरी विधानसभा मतदारसंघ पहिल्यापासूनच शिवसेनेकडे राहिला आहे. २००९ सालच्या विधानसभेत भाजप-शिवसेनेची युती असताना हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. तर २०१४ साली शिवसेनेच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे जर भाजपकडून या जागांवर दावा सांगण्यात येत असेल तर भाजप-शिवसेनेत वाद होण्याची चिन्हे आहेत”, असे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी म्हटले आहे.

Related posts

दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी

News Desk

उद्याच सादर होणार मराठा आरक्षणाचा एटीआर

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk