HW News Marathi
राजकारण

शिंदे गट-शिवसेना राडा प्रकरणी पोलिसांनी सदा सरवणकरांची पिस्तुल केली जप्त

मुंबई | गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी (Police) शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांची पिस्तुल जप्त केली आहे. आणि दादर पोलिसांनी सदा सरवणकर आणि त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांनी दोघांना समन्स पाठवल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सरवणकरांनी पिस्तुलमधून गोळी झाडल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, दादर पोलिसांनी सरवणकरांवर आर्म्स अॅक्ट गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सरवकरणांची पिस्तुल जप्त केली असून दोन्ही पिता-पुत्रांना समन्स पाठविला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पिस्तुलाची तपासणी करण्यात येणार असल्याचे माहिती मिळाली आहे.

नेमके काय आहे प्रकरण

शिवसेनेकडून गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांचे स्वागतासाठी मंच उभारण्यात आला होता. पण, शिवसेनेच्या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील मंच उभार केला होता. या मंचावरून सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकरांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेचे नेत्यांना चिडविले होते. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. या शाब्दिक चकमकीचे रुपांतर भांडणात झाले. या प्रकरणामुळे दादर परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काहीसा कमी झाला होता. शिंदे गटाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे. शिवसैनिक सगळे हे सहन करायचे का?, आमच्या विभाग प्रमुखांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.

या प्रकरणी दादर पोलिसांनी 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले पाच जणांना अटक केली आहे. यात शिवसेनेचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे. शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना मारहाण झाली असून त्यांनी फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेकडून सुनील शिंदे यांनी सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला जात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रिमंडळात जाण्याची इच्छा नाही

News Desk

इंडस्ट्रीयल एडीशनल सचिव सतीश गवई यांना दिली ७ कोटींची लाच, मलिक यांचा आरोप

News Desk

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk